Havaman Andaj । पुणे : मागील अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांसह सर्वसामान्य पावसाची (Maharashtra Rain) आतुरतेने वाट पाहत आहेत. राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये पावसाची प्रतिक्षा कायम आहे. अशातच हवामान खात्याने पावसाबाबत नवीन अपडेट (IMD Update) दिली आहे त्यामुळे सर्वांना दिलासा मिळाला आहे. राज्यात पुन्हा एकदा पावसाचे (Rain) जोरदार आगमन झाले आहे. अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. (Latest Marathi News)
हवामान खात्याने राज्यातील पुणे, पालघर, सातारा, रत्नागिरी, ठाणे आणि नाशिक या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट (Rain in Maharashtra) दिला आहे. हिंगोली, नांदेड आणि लातूर जिल्ह्यांमध्ये पावसाचा कोणताही अलर्ट दिला नाही. परंतु राज्यातील इतर सर्व भागांमध्ये पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दबाचा पट्टा तयार झाल्यामुळे राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. (Rain Alert)
Breaking News । माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना पहाटे झोपेत असतानाच अटक
किती दिवस कोसळणार मुसळधार पाऊस?
दरम्यान, राज्यात 14 सप्टेंबरनंतर पावसाचा जोर वाढणार आहे. 17 सप्टेंबरपर्यंत पावसाचा जोर कायम राहील असा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. याचा फायदा रब्बी हंगामाला देखील होणार आहे. पावसाअभावी जळू लागलेली पिके पुन्हा बहरतील. पावसाच्या आगमनामुळे शेतकऱ्यांवर आलेले संकट टळू शकते.
पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांसह सर्वांच्या चिंतेत भर पडली होती. पाण्याचे मोठे संकट उभे राहिले होते. अशातच आता हवामान खात्याकडून वर्तवलेल्या पावसाच्या अंदाजामुळे सर्वांना काहीसा दिलासा मिळाला आहे. त्याशिवाय कोयनासह राज्यातील इतर धरणांच्या जलसाठ्यादेखील आवक सुरु झाली आहे.