Havaman Andaj । विदर्भातील शेतकरी संकटात! ‘या’ पाच जिल्ह्यांना पावसाची प्रतीक्षा

Vidarbha farmers in crisis! 'These' five districts are waiting for rain

Havaman Andaj । विदर्भ : मागच्या जुलै महिन्यामध्ये राज्यातील अनेक भागात पावसाने थैमान घातले असले तरी अजून काही भागांमध्ये म्हणावा असा पाऊस झाला नाही. यामुळे त्या ठिकाणचे शेतकरी चिंतेत आहेत. जर पुढील काळात पाऊस झाला नाही तर दुष्काळ पडण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. दरम्यान पश्चिम विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यातील अनेक तालुक्यात अजून मुसळधार पाऊस झाला नाही त्या ठिकाणी नदी नाले देखील कोरडे आहेत त्यामुळे या ठिकाणी अजून दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.

Agriculture News । शेतकरी बांधवांसाठी महत्वाची बातमी! गोगलगाय नियंत्रणासाठी करा ‘हा’ उपाय; होईल फायदा

जुलै महिन्यामध्ये याच पाच जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली मात्र काही तालुके या ठिकाणी अजूनही असे आहेत की त्या ठिकाणी दमदार पावसाने हजेरी लावली नाही, त्यामुळे येथील शेतकरी चिंतेत आहेत. थोडाफार पाऊस पडला होता त्यावर शेतकऱ्यांनी पेरणी केली होती मात्र आता पेरलेले बियाणे उगवून आले असून त्यांना आगामी काळात पाणी कसे द्यायचे असा शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न उभा राहिला आहे. त्यामुळे लवकर मुसळधार पाऊस पडावा अशी आशा शेतकऱ्यांना लागली आहे.

Urfi Javed New Look । उर्फी जावेदचा नवीन लुक पाहून डोकं खाजवाल; यावेळी अभिनेत्रीने चक्क खिळ्यापासून…

बुलढाणा शहराला पाणीटंचाईचा मोठा सामना करावा लागणार

जिल्हा मुख्यालयाला पाणीपुरवठा करणाऱ्या येळगाव धरणात फक्त पंधरा टक्के पाणी साठा आहे. माहितीनुसार, हा पाणीसाठा फक्त पुढील एक महिना पुरवठा होऊ शकेल एवढाच पाणीसाठा या धरणामध्ये शिल्लक आहे. धरण परिसरामध्ये पाऊस न पडल्याने आगामी काळात दीड ते दोन लाख लोकसंख्या असलेल्या बुलढाणा शहराला पाणीटंचाईचा मोठा सामना करावा लागणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Mukesh Ambani । मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स कंपनीने एका वर्षात २ लाख ६० हजार लोकांना दिला रोजगार

त्याचबरोबर अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर, धारणी आणि अंजनगाव सुर्जी या तीन तालुक्यांमध्ये पाऊस खूप कमी झाला आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभा राहिले आहे त्यामुळे आता पिण्याच्या पाण्यासाठी देखील दमदार पावसाची प्रतीक्षा त्या ठिकाणचे नागरिक करत आहेत.

Poco M6 Pro 5G । दहा हजारांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करा ‘पोको’चा हा नवीन फोन

अकोला जिल्ह्यात पावसाची स्थिती काहीशी समाधानकारक

अकोला जिल्ह्याचा विचार केला तर या ठिकाणी पावसाची परिस्थिती काहीशी समाधानकारक आहे. अकोला जिल्ह्यामध्ये ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपर्यंत सरासरी 98.80% इतका पाऊस झाला आहे. त्याचबरोबर जलप्रकल्पामध्येही पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र तरी देखील या ठिकाणी अकोल्यातील काही भागांमध्ये अजूनही समाधानकारक पाऊस झाला नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

Sanjay Raut । “पिसाळलेलं कुत्र चावलं त्यामुळं…” संजय राऊत यांच्यावर शिवसेना नेत्याची बोचरी टीका

Spread the love