Havaman Andaj : ऑगस्ट महिना सुरू होताच राज्यांमध्ये पावसाने विश्रांती घेतली. सध्या राज्यातील बऱ्याच भागांमध्ये ऊन सावल्याचा खेळ पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे तर काही ठिकाणी कडक ऊन पडत असून काही ठिकाणी हलक्या प्रमाणात पाऊस देखील पडत आहे. मात्र चांगला पाऊस पडत नसल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीच संकट आले आहे. त्यामुळे शेतकरी सध्या संकटात आहे.
Rain Update | पावसाने मोडला तब्बल १२२ वर्षांचा रेकॉर्ड, क्षणांतच इमारती जमीनदोस्त
राज्यातील अनेक शेतकरी सध्या मुसळधार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत, यामध्येच आता हवामान खात्याने पावसाबाबत एक महत्त्वाची अपडेट दिली आहे, राज्यांमध्ये पुढच्या पाच ते सहा दिवस पावसाच्या हलक्या सरी कोसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या राज्यात पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण नाही त्यामुळे राज्यात पुढील पाच ते सहा दिवस पावसाच्या हलक्या सरी बसणार आहेत. तर काही ठिकाणी ढगाळ वातावरणांसह कडक ऊन पडलेले पाहायला मिळेल. त्याचबरोबर कोकण गोव्यात पुढील सातही दिवस बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, मराठवाड्यात तुरळकी ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
खरिपाची पिके धोक्यात
सध्या खरिपाच्या पिकांना पावसाची गरज आहे. मात्र अजूनही पाऊस झालेला नाही त्यामुळे खरिपांची पिके सुकू लागली आहेत. येत्या काही काळात पाऊस झाला नाही तर ही पिके जुळून नष्ट होतील असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.