Amruta Fadnavis : “तुम्ही प्लास्टिक सर्जरी केली आहे का?” प्रश्नावर अमृता फडणवीसांनी दिलं मजेशीर उत्तर

“Have you had plastic surgery?” Amrita Fadnavis gave a funny answer to the question

मुंबई : ‘बस बाई बस’ हा कार्यक्रम झी मराठीवर चालू आहे. या कार्यक्रमाची सोशल मीडियावर सध्या खूप चर्चा आहे. या कार्यक्रमामध्ये विविध क्षेत्रामध्ये कर्तृत्व गाजवलेल्या महिला सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाच्या पहिल्याच भागामध्ये सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) या ‘बस बाई बस’च्या पुढील भागामध्ये दिसणार आहेत.

‘बस बाई बस’ कार्यक्रमातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहिल्यावर दिसून येत की अमृता फडणवीस खासगी आयुष्यावर भाष्य करत आहेत. या कार्यक्रमामध्ये त्यांना त्यांच्या लुकबद्दल प्रश्न विचारण्यात आला.

“तुम्ही प्लास्टिक सर्जरी केली आहे का?” असा प्रश्न अमृता फडणवीस यांना विचारण्यात आला. त्यावेळी उत्तर देत त्या म्हणाल्या, “चांगलं झालं तुम्ही हा प्रश्न मला विचारला. याबाबत मला अनेक लोकांनी ट्रोल देखील केलं आहे. प्लास्टिक सर्जरी करण्यासाठी खूप किंमत मोजावी लागते. याचा आणखी एक तोटा म्हणजे एकदा का चेहरा बिघडला की भविष्यकाळात तुम्हाला अडचण निर्माण होते. एक सांगते मी लग्नाआधी ब्युटी पार्लरला देखील जायचे नाही. त्यानंतरही लग्नामध्ये मेकअप करतात तोच मी केला होता. देवेंद्रजी पण असे आहेत की ते स्त्रीचा चेहरा नव्हे तर मन पाहतात.”

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *