
व्यसन हे माणसाच्या अधोगतीच कारण आहे. असे समजले जाते. दारू हे एक भयानक व्यसन आहे. दारूने आजपर्यंत अनेकांच्या आयुष्याचे वाटोळे झाले आहे. दारू पिण्याचे परिणाम अतिशय वाईट व गंभीर होतात हे माहीत असूनही लोकांची दारू काही सुटत नाही. रात्री बेरात्री दारू पिऊन इथं तिथं पडणाऱ्यांची संख्या कमी नाही. नुकताच एका दारुड्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral video on social media) होत आहे. या व्हिडिओमध्ये दारू पिणारे दोन मित्र गाडीवर बसण्यासाठी धडपड करत असल्याचे पहायला मिळत आहे.
Viral Photo: विजय देवरकोंडा व रश्मिका मंदानाने गुपचूप केलं लग्न?
दारू पिल्यानंतर माणसाला अगदी साध्या व सोप्प्या गोष्टी करणे देखील अवघड जाते. दारू पिल्यावर माणूस स्वतःवरचा संयम गमावतो. तसेच त्याच्या हालचाली देखील मंदावतात. अगदी अशीच काहीशी परिस्थिती या व्हिडिओमधील दारुड्यांची (Drunked Persons) झाली आहे. या दोन्ही दारुड्यांना गाडीवर बसण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. या व्हिडिओ मधील माणूस गाडीवर बसायला जातो आणि पडतो. यानंतर पुन्हा अगदी कसाबसा उभा राहत तो गाडीच्या जवळ जातो.
बिग ब्रेकिंग! नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी; दोन दिवसांपासून येत आहेत मेसेज
बाइक पर बैठने के लिए कितनी मेहनत कर रहा है युवक असल में यही संघर्ष होता है। pic.twitter.com/efUgMfvvnK
— Jaiky Yadav (@JaikyYadav16) November 11, 2022
यावेळी गाडीवर बसताना तो आपली लुंगी बांधतो. दरम्यान पुन्हा एकदा गाडीवर बसत असताना तो आधीच बसलेल्या माणसाला घेऊन तो पडतो. यामुळे हा व्हिडीओ अतिशय मजेशीर वाटतो. JaikyYadav16 या ट्विटर युजरने हा व्हिडिओ शेअर केला असून त्याने या माणसाच्या हालचालींना रिअल स्ट्रगल म्हंटले आहे.
थेट ऊसवाहतूकदारांना चोप देण्याचा इशारा; अपघात टाळण्यासाठी ‘या’ गावाची अनोखी शक्कल