मुंबई: उर्फी जावेद (Urfi Javed) सोशल मीडियावर कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. फॅशन म्हणून उर्फी कधी काय करेल याचा अंदाज लावणे अशक्य आहे. आता उर्फी तिच्या नवीन लूकमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी उर्फेने चक्क सायकलमध्ये असणाऱ्या चेन पासून ड्रेस तयार करून, तो परिधान केलाय. उर्फीची ही अतरंगी फॅशन बघून चकित झाले आहेत.
धक्कादायक! क्रिकेट खेळत असताना हृदयविकाराचा झटका येऊन दहावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू
याबाबतचा उर्फीने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये पहिल्यांदा उर्फी जावेद सायकल चालवताना दिसत आहे. नंतर यामध्ये सायकलची चेन गळून पडते व चेन गळून पडल्यावर आपण ती सायकल परत दुरुस्त करून लावतो. पण उर्फीनेत्र कमालच केली. तिने ती चेन काढून चक्क तिला ड्रेस म्हणून परिधान केले आहे.
Nilesh Lanke: आमदार निलेश लंके यांनी घेतले उपोषण मागे
उर्फीने या चेनपासून स्वतःसाठी टॉप आणि स्कर्ट बनविले आहे आणि ते परिधान केले आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. नेटकरी या व्हिडिओवर वेगेवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिले की, ”उर्फी ने माझी सायकल चोरी केली आहे.”
ब्रेकिंग! बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात ईशान किशनच्या तुफानी 150 धावा