एमसी स्टॅन हा भारतीय रॅपर (MC Stan Indian rapper) असून तो एका गरीब कुटुंबामधील आहे. आता एमसी स्टॅनने ‘ बिग बॉस 16″ ची ट्रॉफी जिंकली आहे. त्या ट्रॉफीवर त्याने आपले नाव कोरले आहे. तर मराठी बिग बॉस विजेता शिव ठाकरे (Shiv Thackeray) हा फर्स्ट रनर अप ठरलाय.
गौतम अदानींमुळे वीज आणखी महागणार, छगन भुजबळ यांचे वक्तव्य चर्चेत
रविवारी रात्री एका सोहळ्यामध्ये विजेत्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. अभिनेता सलमान खान (Salman Khan) याने या विजेत्यांच्या नावाची घोषणा केली आहे. दरम्यान, एमसी स्टॅन आठवी मध्ये शिकत असतानाच त्याला रॅप साँगचे वेड लागले. नंतर त्याने रॅपरचे शिक्षण घेतले असून त्यातूनच पुढे एमसी स्टॅन हा रॅप साँग लिहायला लागला. नंतर हळूहळू तो प्रसिद्ध देखील झाला.
मोठी बातमी! अदानी समुहाच्या तीन कंपन्यांचे शेअर्स SBI कडे गहाण
एमसी स्टॅनच्या कुटुंबबाबद्दल पहिले तर तो एक गरीब कुटुंबातील मुलगा आहे. त्याचे वडील रेल्वेमध्ये हवालदार आहेत. त्याची आई गृहिणी आहे. ते आधी पुण्यातील ताडीवाला रोडवर राहत होते मात्र आता ते मुंबईला (Mumbai) राहत आहेत. मात्र त्याच्या विजयानंतर ताडीवाला रोड भागात देखील जल्लोष करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे.
एक मुलगा असूनसुद्धा हार्दिक पांड्या पुन्हा एकदा लग्नगाठ बांधणार; ‘या’ दिवशी करणार लग्न
गर्लफ्रेंडमुळे आलेला अडचणीत –
एमसी स्टॅन बिग बॉसचा विजेताठरताच त्याच्याबद्दल अनेक बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आता त्याच्या गर्लफ्रेंडबाबत माहिती समोर आली आहे आहे. त्याची एक्स गर्लफ्रेंडने म्हणजे औझमा शेखने त्याच्यावर मागच्या काही दिवसांपूर्वी आरोप केले होते. या आरोपात ती म्हणाली होती,”एमसी स्टॅनने माझ्या मॅनेजरला मला मारहाण करण्यास सांगितले आहे”. असा आरोप तिने कला होता त्यामुळे या आरोपांचा एमसी स्टॅनच्या इमेजवर देखील परिणाम झाला होता. त्यामुळेच एमसी स्टॅनने बिग बॉसचा खेळ खेळण्याचं ठरविले.
मोठी बातमी! स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांना न्यायालयीन कोठडी