“…यांना शरम नाही”, उद्धव ठाकरे यांची एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका

"...he has no shame", Uddhav Thackeray strongly criticized Eknath Shinde

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे काल खेड दौऱ्यावर होते. यावेळी त्या ठिकाणी त्यांची सभा झाली. या सभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी विविध मुद्द्यावर भाष्य केले आहे. त्याचबरोबर त्यांनी सत्ताधाऱ्यांवर देखील जोरदार टीका केली आहे.

तरुणीने पहिल्यांदा रणबीरला किस करण्याचा प्रयत्न केला अन् नंतर लागली रडायला, पाहा व्हायरल व्हिडीओ

उद्धव ठाकरे म्हणाले, “मी घरात बसून महाराष्ट्र सांभाळला, मात्र तुम्ही दिल्लीसमोर मुजरे करत बसलात. गुजरातच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातील उद्योग पळवले. यामुळे महाराष्ट्रातील तरुण युवकांचे रोजगार गेले. फक्त तुटलेल्या एसटीवर गतिमान महाराष्ट्राची जाहीरात करतात. यांना शरम नाही.” असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

‘या’ गड्याने तर खलीलाही टाकले मागे; उंची 7.2 फूट, 115 किलो वजन

त्याचबरोबर पुढे ते म्हणाले, “ मी हवा की नको हे जनता ठरवेल निवडणूक आयोग नाही ठरवणार. मिंधेंच्या हातामध्ये धनुष्यबाण तरीही चेहरा पडलेला आहे.मात्र, ‘मेरा खानदान चोर है,’ हे कधीच पुसलं जाणार नाही,” अशी जोरदार टीका उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर केली आहे.

नात्यात वाद होऊ नयेत म्हणून नवरा बायकोने टाळाव्यात ‘या’ सवयी

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *