Loksabha election । अवघ्या काही दिवसांच्या अंतरावर लोकसभेच्या निवडणुका (Loksabha election 2024) येऊन ठेपल्या आहेत. उमेदवार देखील निवडणुकीच्या तोंडावर प्रचाराला लागले आहेत. प्रचार करताना काही उमेदवार वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवताना दिसत आहेत. अशातच एका उमेदवाराच्या हटक्या प्रचारशैलीमुळे अनेकजण अवाक झाले आहेत. याला कारणही अगदी तसेच आहे. (Latest marathi news)
Crime News । धक्कादायक! पुण्यात शिक्षणासाठी आलेल्या तरुणीसोबत घडला अतिशय दुर्दैवी प्रकार
उत्तर प्रदेशमधील (UP) अलिगड लोकसभा मतदारसंघामध्ये (Aligarh Lok Sabha Constituency) अपक्ष उमेदवार गळ्यात चक्क चपलांची माळ घालून प्रचार करत आहे. पंडित केशव देव गौतम (Pandit Keshav Dev Gautam) असं या उमेदवाराचं नाव असून त्यांच्या या कृतीमुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. यामागचे महत्त्वाचे कारण म्हणजे त्यांना निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाकडून चप्पल हे चिन्ह मिळालं आहे.
दरम्यान, अलिगड लोकसभा मतदारसंघात सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. येथे भाजपाकडून सतीशकुमार गौतम तर विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीच्या वतीने समाजवादी पक्षाने बिजेंद्र सिंह यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच बसपाने हितेंद्र कुमार उर्फ बंटी उपाध्याय यांना उमेदवारी दिली आहे.
Gudi Padwa 2024 । गुढीपाडव्याच्या दिवशी चुकूनही करू नका ‘या’ गोष्टी, नाहीतर वर्षभर तुम्हालाही…