दिल्ली मधील ( Delhi) श्रद्धा वालकर हत्याप्रकरणाचे वातावरण आता कुठे निवळत आहे इतक्यात आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. दिल्लीमधील एका ढाब्यावर असणाऱ्या फ्रीजमध्ये निकी यादव या मुलीचा मृतदेह सापडला आहे. दिल्लीमधील हरिदासनगर येथे ही घटना घडली असून या प्रकरणी मुलीच्या प्रियकराला अटक करण्यात आली आहे.
उर्फी जावेदने हटके स्टाईलमध्ये चाहत्यांना दिल्या व्हॅलेंटाईन डे च्या शुभेच्छा, म्हणाली…
निकी यादव ही मुलगी आपला प्रियकर साहिल गेहलोत याच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होती. मात्र तिच्या प्रियकराला दुसऱ्या मुलीशी लग्न करायचे होते. याबाबत निकीला समजताच तिचे साहिल सोबत मोठे भांडण झाले. इतकंच नाही तर साहिलने दुसऱ्या मुलीशी लग्न केल्यास आत्महत्या करण्याची धमकी निकीने दिली.
नवनीत राणा व रवी राणा यांच रामदेव बाबांमुळेच जुळलं! दोघांची इंटरेस्टिंग लव्हस्टोरी एकदा वाचाच
यामुळे साहिलने तणावात येऊन निकीला संपवण्याचा कट रचला व संधी मिळताच निकीची हत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार साहिलने सकाळी निकीची हत्या केली आणि त्याच दिवशी घरच्यांच्या सांगण्यावरून दुसऱ्या मुलीशी लग्न केले. 10 फेब्रुवारीला साहिलने निकीची एका कारमध्ये गळा दाबून हत्या केली.
अशी झाली प्रार्थना बेहेरे आहे अभिषेकची भेट; वाचा प्रार्थनाची लव स्टोरी
यानंतर तिचा मृतदेह ( Dead Body) कार मध्येच होता. मात्र हा मृतदेह ठेवण्यासाठी साहिलला कुठेच जागा मिळाली नाही. खूप वेळानंतर त्याने निकीचा मृतदेह ढाब्यावरील फ्रीजमध्ये ठेवला. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.
सत्यजीत तांबेंच्या ट्विटमुळे राजकारणात ट्विस्ट! लवकरच करणार भाजपमध्ये प्रवेश?