आपला भारत देश हा कृषिप्रधान देश आहे. इतकंच नाही तर भारतात शेतीला जोडधंदा म्हणून पशूपालनला शेतकर्यांची (Farmers) पहिली पसंती असते. त्यामुळे अनेक शेतकरी गायी पाळतात. दरम्यान एका व्यक्तीने चक्क महापालिकेतील सिव्हिल इंजिनीअरची नोकरी (Civil Engineer Jobs) सोडून गायी पाळल्या आहेत. हा व्यक्ती या गायी पलनातून (rearing cows) महिन्याला लाखों रुपये कमवत आहेत. गायी पालणातून महिन्याला लाखो रुपये कमावतो यावर कुणाचं विश्वास बसणार नाही. पण हे हे १०० टक्के खर आहे.
मोठी बातमी! अमिताभ बच्चन यांचा अपघात; पायाची नस कापली…
नेमक प्रकरण काय आहे ?
राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यातील कमल मीना (Kamal Meena) हे दिल्ली महानगरपालिकेत सिव्हिल इंजिनीअरची नोकरी होती. पण त्यांना गाव आणि पशुपालनाची ओढ होती. त्यामुळे त्यांचे दिल्लीत मन लागत नव्हते. त्यामुळे त्यांनी २०१८ मध्ये नोकरीचा राजीनामा देवून उछान शहराजवळील पाणा गावात आले आणि १५ बिघा जागेत लोहगड फार्म हाऊस बांधले.
कमल मीना यांनी गुजरातमधून गीर जातीच्या चार गायी येथे आणल्या आणि त्यांचे संगोपन केले. दरम्यान आता कमल मीना हे गाईच्या दुधापासून शेणापर्यंतचे पदार्थ बनवून चांगली कमाई करत आहे. गाई पालनासोबतच शेणखताने सेंद्रिय शेती करतात. इतकंच नाही ते यासोबतच ते फार्म हाऊसमध्ये सेंद्रिय शेतीही करत आहेत. दरम्यान कमल मीना यांच्या फार्म हाऊसमध्ये २५ गायी आहेत.
Urfi Javed: उर्फीने चक्क फुफ्फुसांच्या आकाराचा ड्रेस केला परिधान, पाहा VIDEO
ते या 25 गायांपासून दरवर्षी प्रति गाय २.५ लाख रुपये कमावत आहेत. तसेच याशिवाय ते शेणापासून बनवलेल्या पर्यावरणपूरक मूर्ती, भांडी, दिवे, अगरबत्ती, शुभ लाभ पुतळा, लाकूड अशा ५५ वस्तूंची विक्री करतात. इतकंच नाही तर कमल मीना गायीचे दूध ५० रुपये प्रतिलिटर आणि तूप २५०० रुपये किलो दराने विकत. एका गायीच्या देखभालीवर कमल मीना हे वर्षाला ३५ ते ५० हजार रुपये खर्च करतात.
रुग्णालयात घडला धक्कादायक प्रकार, दोन नर्सेसने तरुणांना केली बेदम मारहाण; व्हिडिओ व्हायरल
कमल मीना यांच्या फार्म हाऊसमध्ये बाजरी, ऊस, ज्वारी, पेरू, मनुका याशिवाय अनेक प्रकारच्या भाज्याही पिकवल्या जातात. फार्म हाऊसमध्ये पिकवलेल्या भाज्यांमध्ये फ्लॉवर, कोबी, भिंडी, पालक, मेथी, कोथिंबीर, भोपळा, तूप, सीताफळ, मिरची आणि तिखट यांचा समावेश होतो. दरम्यान त्याचवेळी झिंक आयर्न असलेला काळा गहू ८ हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत, मोत्याचा बोधका गहू ६ हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत विकला जात आहे.
वीर जवानांनी देशाच्या सीमेवर साजरी केली दिवाळी, जनतेला दिला अभिमानास्पद संदेश