सापांच्या अनेक प्रजाती जगभरात आढळतात, यामध्ये काही अत्यंत विषारी साप (Snake) असतात. त्यामुळे लोक सापापासून जरा भिऊनच असतात. मात्र सध्या सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे जो पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल, या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक माणूस किंग कोब्राला पाण्याने न घाबरता आंघोळ घालताना दिसत आहे.
गिरीश बापट यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात!
या व्हिडिओमध्ये एक माणूस किंग कोब्राला अगदी आरामात आंघोळ घालताना दिसत आहे, पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे भीतीऐवजी त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो. हा साप देखील लहान मुलाप्रमाणे आंघोळ करताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्याचबरोबर व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, तो व्यक्ती सापाच्या फणाला स्पर्श करण्याचा प्रयत्न देखील करत आहे.
A man in India shows kindness to a king cobra by cooling it off on a hot sunny day. pic.twitter.com/WckNvnZN2V
— Tansu YEĞEN (@TansuYegen) March 28, 2023
मोठी बातमी! जितेंद्र आव्हाड यांच्या बॉडीगार्डची आत्महत्या
हा व्हिडिओ @TansuYegen या ट्विटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. नेटकरी या व्हिडिओवर वेगेवगेळ्या प्रतिक्रिया देखील देत आहे.
धोनीच्या आयुष्यात बायकोच्या आधी खास होती ‘ही’ व्यक्ती; लग्न करणार होता पण…