अनेक मुलांना गाडी चालवताना उगीच स्टंट करण्याची आवड असते. पुढचे चाक उचलून गाडी चालवणे, वाकडी तिकडी गाडी चालवणे असे अनेक प्रकार तुम्ही पाहिले असतील. इतकंच नाही तर आपल्या प्रेयसीला ( Girlfriend) पुढे गाडीवर बसवून स्टंट करणाऱ्यांचे फोटो देखील नेहमी व्हायरल होत असतात. दरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय. ज्यामध्ये एक कपल गाडीवर बसून रोमान्स करत आहे.
दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरासमोरील रस्ता आज बंद
या व्हिडीओमध्ये तरुण आणि तरुणी दोघांनीही हेल्मेट घातलेले आहेत. स्पोर्ट्स बाईकवर ( Couple on sports bike) असणारे हे रायडर कपल गाडीवरच प्रपोज करताना या व्हिडीओमध्ये पहायला मिळत आहे. या कपलचा अनोखा रोमँटिक अंदाज व धाडस पाहून नेटकरी देखील थक्क झाले आहेत.
धक्कादायक! मुलाने मुलगी पळून नेल्याने संपूर्ण कुटुंबानेच केली आत्महत्या
इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून सध्या तो प्रचंड व्हायरल होतोय. अनेक लोकांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. या सोबतच नेटकऱ्यांनी व्हिडीओवर विविध प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. काही युजर्सनी तर या कपलवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
धक्कादायक! मुलाने मुलगी पळून नेल्याने संपूर्ण कुटुंबानेच केली आत्महत्या