मुंबई : सत्ताधारी पक्षनेते आणि विरोधी पक्षनेते एकमेकांवर सतत टीका, टिपण्णी करत असतात. अशातच भाजप (BJP) पक्षाचे नेते तथा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी शिवसेना (shivsena) उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aadity Thakreay) यांच्यावर निशाणा साधला आहे.
अकोल्यातील तिरडीवरुन उठलेल्या तरुणाचे धक्कादायक आणि विचित्र वास्तव समोर
रावसाहेब दानवे म्हणाले, “आम्ही कोणावर तुटून पडलो नाही. वयाचा एक भाग असतो. त्यांच्या वयोमानुसार त्यांनी वक्तव्य केली पाहिजे. तर, त्यांच्यावर भाजपाचा कोणताही नेता तुटून पडणार नाही. त्यांनी पंतप्रधान मोदी आणि उपमुख्यमंत्री फडवणीस यांच्यावर पातळी सोडून बोलणं चुकीचं आहे.” दरम्यान, रावसाहेब दानवे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेला आदित्य ठाकरे काय प्रत्युत्तर देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
राज्य सरकारचा मोठा निर्णय, पोलिस-तलाठीसह विविध पदांसाठी होणार ७५ हजार पदांची भरती
तसेच, बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री असे बॅनर लावले आहेत. त्यावर रावसाहेब दानवे यांनी भाष्य केलं आहे. हा संख्याबळाचा खेळ आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढत जास्तीचे आमदार आले तर, मुख्यमंत्री होऊ शकतात. लोकशाहीत ज्याच्या बाजूने जास्ती लोकं तो या राज्याचा आणि देशाचा राजा. त्यामुळे कोणाच्या बोलण्याने मुख्यमंत्री होत नसतो, असं दानवे यांनी म्हटलं आहे.