
सोशल मीडियावर (Social media) दररोज अनेक वेगेवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ गमतीशीर असतात तर काही व्हिडीओ अत्यंत धक्कादायक देखील असतात. सध्या सोशल मीडियावर एक गमतीशीर व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
धक्कादायक! आयटी इंजिनिअरने पत्नी व मुलाचा खून करून केली आत्महत्या
या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका तरुण वयातील मुलाचा वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या मित्रांनी त्याच्यासाठी केक आणला आहे. त्याचबरोबर त्याच्या गळ्यात फुलांचा हार देखील घातला आहे. बर्थडे बॉय केक कापायला लागला यावेळी त्याच्या मित्रांनी फायर कॅण्डल लावताच तो खुर्चीवरून खाली पडल्याचे या व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे. यावेळी तो घाबरून खाली पडल्याचे दिसत आहे त्यामुळे त्याचे मित्र देखील त्याला हसत आहेत.
कोल्हापूरमधील तरुणीची आत्महत्या; तरुणाच्या त्रासाला कंटाळून घेतला निर्णय
हा व्हिडीओ jadugarbadboy04 या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. नेटकरी या व्हिडिओवर वेगेवेगळ्या कमेंट देखील करत आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिले की ‘भाई डर गया’ त्याचबरोबर काही युजर हसण्याचे ईमोजी देखील कमेंट करत आहेत.
भर उन्हामध्ये झाली ढगफुटी? व्हिडीओ पाहून डोकं चक्रावेल; पाहा VIDEO