दोन वेळचे जेवणही मिळत नव्हते, आज आहे कोट्यवधींचा मालक; वाचा एमसी स्टॅनच्या संघर्षमय जीवनाची कहाणी

He was not even getting two meals a day, today he is the owner of crores; Read the story of MC Stan's struggling life
pc – facebook

‘बिग बाॅस 16’चा (Bigg Boss 16) महाअंतिम भाग अगदी जल्लोशात पार पडला आहे. ‘बिग बाॅस 16’ची ट्राफी (Trophy) एमसी स्टॅनने (MC Stan) पटकावली आहे. त्यामुळे त्याच्या नावाची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे. पण हा एमसी स्टॅन आहे तरी कोण? तुम्हाला माहित आहे का? चला तर मग जाणून घेऊया एमसी स्टॅनचा जीवनप्रवास…

सर्वात मोठी बातमी! पहाटेच्या शपथविधीवरून देवेंद्र फडणवीस यांनी

एमसी स्टॅन हा पुण्याचा रहिवासी असून तो रॅपर म्हणून प्रसिद्ध आहे. एमसी स्टॅनचे खरे नाव अल्ताफ तडवी असे आहे. त्याचा जन्म 30ऑगस्ट 1999 साली झाला आहे. एमसी स्टॅनला रॅप करणे प्रचंड आवडते. पण त्याला रॅप करण्साठी घरच्यांनी कडाडून विरोध केला जात होता.

दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना कॉपी करण्याचा चान्सच नाही, परीक्षेदरम्या

एमसी स्टॅनच्या घरची परिस्थिती हलाखीची होती. स्टॅनचे वडिल रेल्वेत हवालदार होते. परंतु, त्यांची परिस्थिती इतकी बेताची होती की, कधी कधी उपाशीपोटी रस्त्यावर झोपायला लागत असायचे. स्टॅनने केलेल्या रॅपर मधून सॉंग मधून पैसे मिळणार नाही, असे त्याच्या आईवडिलांना वाटायचे. त्यामुळे त्यांची इच्छा होती की, त्याने मोठं काय तरी व्हावं.

एमसी स्टॅनने वयाच्या 12व्या वर्षी परफॉर्म करण्यास सुरुवात केली. त्याला लिखानाची आवड होती. त्यामुळे त्याने गाणी लिहीण्यास सुरूवात केली. गरिब घरातून आलेल्या MC Stan ने फक्त स्वत:च्या जिद्दीच्या जोरावर जगभरात नाव कमावलं आहे.

मोठी बातमी! शिंदे सरकार टिकणार की कोसळणार? सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च

दरम्यान, एमसी स्टॅनने ‘अस्तगफिरुल्लाह’ नावाने त्याचं पहिलं रॅप साॅंग रिलीज केले. ते प्रचंड हिट झाले. या गाण्यातून त्याने स्वतःची कहाणी सांगितली आहे.याच गाण्याने स्टॅनला स्टार बनवलं. त्यानंतर स्टॅनला हिंदी भाषेवर प्रेम असून त्याने त्याच्या लेबलचं नाव हिंदी रेकॉर्ड्स असं सुरू केलं.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *