
जेव्हा जेव्हा सोशल मीडियावर साप, कोब्रा किंवा इतर कोणत्याही जातीच्या सापांचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. कित्येक वेळा साप एकतर लोकांना इजा करताना किंवा मुंगूसशी भांडताना दिसतात. पण सापाचा एक वेगळाच व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये साप मृत्यूशी झुंज देताना दिसत आहे. पण शेवटी एका व्यक्तीने त्या सापाचा जीव वाचवला आहे.
मोठी बातमी! महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचाराला सुरुवात
अनेकदा प्राण्यांना आपण काय खात आहोत याची जाणीवही नसते. सापाने चक्क प्लास्टिकचा पाईप गिळला आहे. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, सापाने प्लॅस्टिक पाईप गिळल्यानंतर एक माणूस त्याच्या पोटातून तो पाईप बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत आहे.
‘टॅटू दाखवण्यासाठी सगळा अट्टहास’ बोल्ड तपकिरी ड्रेसमध्ये दिसल्या मोहक अदा
जर एखाद्या व्यक्तीने असे अन्न खाल्ले जे पचण्यास कठीण आहे, तर त्याचे आरोग्य बिघडते. असाच काहीसा प्रकार या सापाबाबत घडला आहे. प्लॅस्टिकच्या पाईपचे तुकडे अन्न समजून सापाने गिळले असावेत. खूप प्रयत्नानंतर साप हळूहळू गिळलेल्या पाईपचे तुकडे तोंडातून बाहेर काढत आहे. आणि त्यासाठी एका व्यक्तीने त्याला मदत केली आहे. त्यामुळे त्या व्यक्तीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
प्राजक्ता माळीची ‘ती’ पोस्ट चर्चेत; बोलताना शब्द सुचेना झाली भावूक
Snake naveen या इंस्टाग्रामवर अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ पाहून लोकांना आश्र्चर्याचा धक्का बसला आहे. तुम्ही सोशल मीडियावर सापाचे अनेक व्हिडिओ व्हायरल झालेले पाहिले असतील. हा व्हिडिओ खूपच धक्कादायक आहे. हा थरारक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तरुणाच्या या धोकादायक कृत्यावर काही नेटकरी प्रतिक्रिया देत आहेत. व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हीही थक्क झाल्याशिवाय राहणार नाहीत.
लाला गाल, मोठे डोळे; तब्बल १२८ तासानंतर ढिगाऱ्याखालून नवजात बाळ सुखरुप बाहेर