आज सगळीकडे प्रजासत्ताक दिन (Republic Day) मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. मात्र आता प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच दिल्लीमध्ये (Delhi) एक धक्कदायक घटना समोर आली आहे. दिल्ली पोलिस हेड कॉन्स्टेबल स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेबाबत दिल्ली पोलिसांनी माहिती दिली आहे.
पक्ष फुटीनंतर उद्धव ठाकरे आज पहिल्यांदाच ठाणे दौऱ्यावर; राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण
या घटनेची माहिती मिळताच मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून पोस्टमॉर्टमसाठी (Postmortem) पाठवला आहे. आता या प्रकरणाचा तपास पोलीस यंत्रणा करत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आत्महत्या केलेल्या हेड कॉन्स्टेबलचे नाव देवेंद्र कुमार (Devendra Kumar) आहे.
हेड कॉन्स्टेबल देवेंद्र कुमार यांनी आत्महत्या का केली हे अजून स्पष्ट झालेलं नाही. सध्या बॅरेकमध्ये सापडलेल्या सुसाईड नोटचा तपास पोलीस यंत्रणेकडून चालू आहे.
मोठी बातमी! अदानी समूह संकटात; व्यापार क्षेत्रात बसला मोठा धक्का