हेल्थ मिनिस्टर स्त्री आरोग्याचे महत्त्व सांगणारा एक आगळावेगळा कार्यक्रम

Rashin News

महाराष्ट्रातील महिलांसाठी नवनवीन कार्यक्रम आपण पाहत असतो. आयोजित करत असतो तसाच एक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेला कार्यक्रम म्हणजे ‘होम मिनिस्टर’ परंतु काळाची ओळख पाहून, काळाची गरज समजाऊन घेवुन,, स्री आरोग्याचे महत्व सांगणारा खेळ पण… ज्ञान पण… आणि पैठणी पण…. अशा त्रिसूत्रीचा एकत्र मिलाप असणारा…. ‘हेल्थ मिनिस्टर’ हा कार्यक्रम आता नव्याने उदयास आलेला आहे.

Gopichand Padalkar । धनगर आरक्षणाबाबत गोपीचंद पडळकर यांनी केली सर्वात मोठी घोषणा!

या कार्यक्रमाची सर्व महिलांमध्ये क्रेझ वाढत आहे. हेल्थ मिनिस्टर या कार्यक्रमाची संकल्पना व मांडणी श्री महेशकुमार मांडगे यांनी केली असुन, हा कार्यक्रम होस्ट करून महाराष्ट्राला ओळख करून दिली आहे. आणि या कार्यक्रमातून संपुर्ण कुटुंबाच्या आरोग्याचे महत्त्व सांगणारा, आरोग्याला धरून काम करणाऱ्या सर्वांचे महत्त्व सांगणारा हा आगळावेगळा कार्यक्रम महिलांमध्ये अतिशय लोकप्रिय होताना दिसत आहे.

Dhangar Reservation । धक्कादायक! मराठा आरक्षणानंतर धनगर आरक्षणासाठी तरुणाने गळफास घेत केली आत्महत्या

आदरणीय डॉक्टर माई उत्तम ढेरे या राशीन मधील प्रसिद्ध डॉक्टर आहेत. राशीन व परीसर येथे नगर जिल्हा परिषद अध्यक्षपद आदरणीय पवार साहेबांमुळे संधी मिळाली. आज राशीन मधे महिलांसाठी डॉ सुनिल डाके यांचे जगदंबा हॉस्पिटल अँड आयसीयू पुरस्कृत एक आगळा वेगळा हेल्थ मिनिस्टर कार्यक्रम माईंनी घेतला होता. विजेत्या महिलांना बक्षीस वितरणाचा कार्यक्रम अग्रीक्लचरल डेव्हलमेंट ट्रस्टच्या विश्वस्थ आदरणीय सौ.सुनंदा पवार यांच्या हस्ते पार पडला. यावेळी महिलांच्या आरोग्याचा जागर खुप छान झाला या शब्दात वहिनींनी कार्यक्रमाचे कौतुक केले. डॉ मीनल डाके व डॉक्टर सुनील डाके यांनी सर्वांचे आभार मानले

Ajit Pawar । अजित पवारांचं मराठा आरक्षणाबाबत मोठे वक्तव्य; म्हणाले, “मागण्या टाळतोय…”

Spread the love