Heart Attack in Kids । मुलगी मोबाईलवर कार्टून बघत होती, अचानक बेशुद्ध पडली अन् हृदयविकाराच्या झटक्याने जागीच मृत्यू

Heart Attack in Kids

Heart Attack in Kids । लोक अनेकदा आपल्या मुलांना मोबाईल देतात आणि घरातील कामे करू लागतात. पण उत्तर प्रदेशातील अमरोहा येथून एक अशी बातमी समोर आली आहे, जी वाचून तुमचे होश उडतील. मोबाईलकडे पाहत असतानाच अचानक 5 वर्षाच्या मुलीची तब्येत बिघडली. तिच्या कुटुंबीयांनी तिला तातडीने रुग्णालयात नेले, मात्र त्या मुलीचा जीव वाचू शकला नाही. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. हृदयविकाराच्या झटक्याने मुलीचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

Jairam Ramesh । आत्ताच्या घडीची मोठी बातमी! काँग्रेसच्या बड्या नेत्याच्या गाडीवर जमावाचा हल्ला

मुलगी मोबाईलवर कार्टून पाहत होती, असे सांगितले जात आहे. अचानक तिच्या हातातून मोबाईल पडला आणि ती बेशुद्ध झाली. कुटुंबीयांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. यादरम्यान मुलीचा मृत्यू झाला. मुलीच्या मृत्यूची बातमी समजताच कुटुंबात खळबळ उडाली. अमरोहाच्या हसनपूर तहसीलमधील हथियाखेडा गावातील हे प्रकरण आहे.

Amruta Fadnavis । ब्रेकिंग! अमृता फडणवीस यांनी केली मोठी घोषणा

मुलगी निरोगी असल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. तिला कोणत्याही प्रकारचा आजार नव्हता. शनिवारी रात्री मुलगी आईसोबत कॉटवर बसून मोबाईल पाहत होती. अचानक तिची प्रकृती खालावली. कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, मुलीला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि ती बेशुद्ध झाली. त्यानंतर तिला खासगी रुग्णालयात दाखविले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. हृदयविकाराचा झटका हे देखील मुलीच्या मृत्यूचे कारण असू शकते, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

Ajit Pawar । पुण्यात अजित पवार यांना सर्वात मोठा धक्का!

Spread the love