Heart Attack । धक्कादायक घटना! चालत्या दुचाकीवर हृदयविकाराचा झटका, 26 वर्षीय तरुणाचा मृत्यू

Heart Attack

Heart Attack । हल्ली हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याचे प्रमाण सुरूच आहे. अलीकडच्या काळात सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत, ज्यामध्ये दिसत आहे की हृदयविकाराचा झटका आल्यामुळे अनेकांनी आपला जीव गमावला आहे. सध्या देखील एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. इंदूरमध्ये चालत्या दुचाकीवरून जात असताना एका तरुणाला हृदयविकाराचा झटका आला. आणि यामध्ये तरुणाने आपला जीव गमावला आहे.

Eknath Shinde । शिवनेरी किल्ल्यावरून मराठा आरक्षणासंदर्भात एकनाथ शिंदे यांनी केली सर्वात मोठी घोषणा!

लहान भावासोबत घरातील साहित्य घेण्यासाठी जात असताना ही घटना घडली. हृदयविकाराचा झटका येताच ते चालत्या दुचाकीवरून खाली पडले. लोकांनी त्याला तात्काळ रुग्णालयात नेले पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता.

Nitesh Rane । पोलिसांविषयी नितेश राणे यांचे धक्कादायक विधान; म्हणाले, “ते फक्त बायकोला…”

राहुल राईकवार असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. राहुलचे वय २६ वर्षे आहे. शनिवारी राहुल हा त्याच्या लहान भावासोबत घरातील साहित्य घेण्यासाठी जात होता. राहुल दुचाकीवर मागे बसला होता आणि त्याचा लहान भाऊ दुचाकी चालवत होता. वाटेत राहुलच्या छातीत दुखू लागले. यानंतर तो चालत्या दुचाकीवरून खाली पडला. आणि हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला.

Manoj Jarange । मनोज जरांगे यांचे उपोषण 10 व्या दिवशीही सुरू, मराठा आरक्षणावर सरकारला 20 फेब्रुवारीचा अल्टिमेटम

Spread the love