मुंबई : आजकाल बरेचजण सुट्टीच्या दिवशी फिरण्यासाठी, पर्यटनासाठी आपल्या लहान मुलांसोबत जात असतात. पण अशा काही जीवावर बेतणाऱ्या घटना देखील घडत असतात. अशीच एक धक्कादायक घटना मुंबईतील (Mumbai) घाटकोपर परिसरामध्ये घडली आहे. मॉलमध्ये घसरगुंडी खेळताना चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
साखर कारखाने काट्यामध्ये शेतकऱ्यांचा ऊस लुटतात – राजू शेट्टी
मुंबईतील घाटकोपर (Ghatkopar) परिसरातील मॉलमध्ये किड्स झोनमध्ये खेळत असताना तोल जाऊन तीन वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. घाटकोपरच्या नीलयोगस मॉलमध्ये ही घटना घडली आहे.
अरे बापरे! मुलाला साप चावताच, मुलगाही चावला सापाला; पाहा नेमकं काय आहे प्रकरण?
घटना अशी घडली की, तीन वर्षांची चिमुकली आई-वडिलांसोबत घाटकोपरमधील निलियोग मॉल येथे गेली होती. त्यावेळी चिमुकली खेळता खेळता घसरगुंडीवरुन पडून बेशुद्ध झाली. तिच्या डोक्याला मार लागला असून गंभीर जखमी. तिला तात्काळ रुग्णालयात देखील दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तिला तपासले असता फार उशीर झाल्याचे सांगून तिला मृत घोषित केले.
पुणे येथे फलोत्पादन पिकांमधील मूल्यसाखळी वृद्धी-क्षमता व संधी या विषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन