HeartAttack । हल्ली हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याचे प्रमाण सुरूच आहे. अलीकडच्या काळात सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत, ज्यामध्ये दिसत आहे की हृदयविकाराचा झटका आल्यामुळे अनेकांनी आपला जीव गमावला आहे. सध्या देखील एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक पेंटर घर रंगवताना दिसत आहे. मात्र अचानक त्याची प्रकृती खालावली आणि हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ मध्य प्रदेशातील इंदूर शहरातील असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर हा व्हिडिओ आत्तापर्यंत ३ लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे आणि ते मोठ्या प्रमाणावर शेअरही करत आहेत. व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर @KashifKakvi नावाच्या युजरने शेअर केला आहे.
Pune Accident News । पुण्याच्या कात्रज बोगद्यात ५ गाड्यांचा अतिशय विचित्र अपघात, महिला जखमी
युजर्सच्या म्हणण्यानुसार, इंदूरचा पेंटर आशिष काम करताना नर्व्हस वाटत होता. तो उठला, लगेच पाणी पिऊन तोंड धुवून परतला. त्यानंतर अचानक छातीत दुखू लागले. तो पेंटच्या डब्यावर बसला पण एका मिनिटात तो पडला. त्याच्या हृदयाचे ठोके बंद झाले होते. लोकांनी त्याला हॉस्पिटलमध्ये नेले तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.
Viral Video । लहान मुलांना गाडीच्या छतावर झोपवून लहान SUV कार धावली; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल
Indore | Heart Attack |
— काश/if Kakvi (@KashifKakvi) December 28, 2023
काम के दौरान इंदौर के पेंटर आशीष को घबराहट हुई। वह उठा तुरंत पानी पीया और मुंह धो कर लौटा।
उसके बाद एका एक सीने में दर्द उठा। वह पेंट के डब्बे पर बैठ गया पर 1 मिनट के अंदर वह गिर पड़ा।
उसके दिल की धड़कन रुक चुकी थी।
आज घर से निकलते वक्त आज कोई भी… pic.twitter.com/fqcERlA7pP