Boy Dies after Dog Bite । हृदयद्रावक! कुत्रा चावल्याने १४ वर्षीय मुलाचा वडिलांच्या कुशीत तडफडून मृत्यू

Heartbreaking! A 14-year-old boy died after being bitten by a dog

Boy Dies after Dog Bite । कुत्रा (Dog) हा घरातील पाळीव प्राण्यांपैकी एक प्राणी. आपल्या गैरहजेरीत तो आपल्या घराचे रक्षण करतो. शिवाय त्याचा वापर पोलीस दलामध्येही केला जातो. सध्या कुत्र्याच्या अनेक जाती अस्तित्त्वात आहेत. समजा एखाद्या व्यक्तीला कुत्रा चावला (Dog Bite) आणि त्यावर वेळेत उपचार केले नाही तर त्या व्यक्तीचा मृत्यूदेखील होऊ शकतो. सध्या अशीच एक घटना घडली आहे. (Latest Marathi News)

Crop Crisis । बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी संतप्त, वांग्याच्या पिकावर फिरवला ट्रॅक्टर

मिळालेल्या माहितीनुसार ही घटना उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमधील आहे. एका १४ वर्षीय मुलाला दीड महिन्यांपूर्वी कुत्रा चावला होता. त्या मुलाने भीतीपोटी याची माहिती कोणालाच दिली नाही. परंतु अचानक तीन दिवसांपूर्वी त्याची रेबीजमुळे (Rabies) तब्येत बिघडली होती. त्याला पाण्याची भीती वाटू लागली. त्याने खाणे-पिणे देखील सोडले होते. कुत्र्याच्या भुंकण्यासारखा आवाज तो काढू लागला होता.

हातावर नारळ ठेवून खरंच जमिनीतील पाणी शोधता येते का? यामध्ये कितपत सत्यता आहे? वाचा महत्वाची माहिती

धक्कादायक बाब म्हणजे रुग्णालयांमध्ये डॉक्टरांनी उपचारासाठी असमर्थता दर्शवली. कुत्रा चावल्याने त्याचे इन्फेक्शन संपूर्ण शरीरात पसरले होते. जास्त त्रास होऊ लागल्याने त्याला जीटीबी आणि एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. परंतु त्याचा वडिलांच्या कुशीत अॅम्बुलन्समध्ये तडफडून जीव गेला. जर त्याला वेळेत उपचार मिळाले असते तर त्याचा जीव गेला नसता.

Maratha Reservation : ‘सरकारने माझा जीवच घ्यायचा ठरवलंय’; मनोज जरांगेंचे सरकारवर गंभीर आरोप

Spread the love