मागील काही दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस (Rain in Maharashtra) पडत आहे. ठिकठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले आहे, काही भागात पूर परिस्थिती निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. पावसाचा आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटक बाहेर पडत आहे. परंतु निष्काळजीपणामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. अशीच काहीशी घटना कल्याण-ठाकुर्लीमध्ये (Kalyan-Thakurli) घडली आहे. (Latest Marathi News)
मुंबईत (Mumbai) मुसळधार पावसामुळे रेल्वे वाहतुकीवर झाला आहे. अंबरनाथ (Ambernath) लोकल ठाकुर्ली आणि कल्याण या दरम्यान दोन तासांहुन अधिक वेळ उभी होती. त्यामुळे प्रवाशांनी रेल्वेतुन उतरून पायी चालत होते. या ट्रॅकच्या बाजूला एक नाला आहे तेथून चालण्यासाठी खूप कमी जागा आहे. याच दरम्यान एक छोटं बाळ घेऊन एक काका आणि त्या बाळाची आई चालत होते. परंतु अचानक या नाल्याजवळ त्या काकाच्या हातातून चार महिन्यांचं बाळ निसटलं आणि त्या वाहत्या पाण्यात पडल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
बाळाच्या आईसमोरच हा धक्कादायक प्रकार घडल्याने तिने हंबरडा फोडला. बाळाला वाचवण्यासाठी तिने नाल्याजवळ धाव घेतली परंतु इतर प्रवाशांनी तिला अडवलं. दरम्यान या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social media) चांगलाच व्हायरल होत आहे. अग्निशामक दलाचे कर्मचारी घटनास्थळी झाले असून बाळाचा शोध सध्या सुरु आहे.
Rain in Maharashtra | राज्यातील नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, अनेक भागात पूरस्थिती