Maharashtra rain । राज्यात आज पुन्हा मुसळधार पाऊस! पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांत पावसाचा रेड अलर्ट जारी

Heavy rain again today in the state! Red alert issued for rain in 'these' districts including Pune

Maharashtra rain । यंदा राज्याला पावसाने चांगलेच झोडपून (Heavy Rain in Maharashtra) काढले आहे. मागील काही दिवसांमध्ये पावसाने दडी मारली होती त्यामुळे बळीराजाची चिंता वाढली होती. पाऊस (Rain) नसल्याने पेरण्या रखडल्या होत्या. अखेर पावसाने दमदार हजेरी लावली आहे. अशातच हवामान खात्याने (IMD) पुन्हा एकदा येत्या ४ दिवसात राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा दिला इशारा आहे. (Latest Marathi News)

आक्रोश आणि फक्त आक्रोश; इर्शाळवाडी या ठिकाणी भयानक स्थिती

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज पुण्यासह (Pune) पालघर, ठाणे आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असून जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याशिवाय मुंबई, (Mumbai) रत्नागिरी आणि सातारा या ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. विदर्भासह कोल्हापूर, नाशिक तसेच सिंधुदूर्ग जिल्ह्यात यलो अलर्ट जारी केला आहे.

Maharashtra Heavy Rain । राज्यासाठी पुढील 24 तास अतिमहत्त्वाचे! हवामान खात्याने वर्तवली वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

दरम्यान, राज्यात पावसाने हजेरी लावल्याने धरणातील पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे पाणी टंचाईचे संकट टळले आहे. काही जिल्ह्यांमध्ये पावसाने रौद्ररूप धारण केले आहे. पूर परिस्थिती निर्माण झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. भीषण पावसामुळे ठिकठिकाणी दरड कोसळल्याचे पाहायला मिळत असून वाहतूक सेवा ठप्प झाली आहे.

अतिशय भयानक दुर्घटना! संपूर्ण गावावर कोसळली दरड, 60 जण अडकले ढिगाऱ्याखाली

तर राज्यात अनेक भागात पावसाने पाठ फिरवली आहे. पावसाअभावी पेरण्या रखडल्या आहेत. जुलै महिना संपत आला तरी यंदा पावसाने ओढ दिल्याने बळीराजा कचाट्यात सापडला आहे.

हृदयद्रावक! चार महिन्याचे बाळ हातून निसटलं आणि गेलं पाण्यात वाहून

Spread the love