Site icon e लोकहित | Marathi News

Maharashtra Rain । पुणे, मुंबईसह राज्यातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा अंदाज; जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज

Imd

Maharashtra Rain । मागील काही दिवसांपासून राज्यात मान्सून (Rain) सक्रिय झाला आहे. राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये (Maharashtra Rain) मुसळधार पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. यंदा जोरदार पाऊस कोसळत असल्याने बळीराजा सुखावला आहे. परंतु राज्यातील अनेक भागात पावसाने दांडी मारली आहे. त्यामुळे पेरण्या रखडल्या आहेत. दरम्यान, हवामान खात्याने (IMD Alert) पुन्हा एकदा काही भागात मुसळधार पाऊस पडणार असल्याची माहिती दिली आहे. (Latest Marathi News)

धक्कादायक! मध्यरात्री एका टोळक्याने केला पोलिसांवर गोळीबार, एक पोलीस जखमी

काही दिवसांपासून मुंबई उपनगर, ठाणे, नवी मुंबई आणि कोकणातही पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. त्याशिवाय पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विभागाकडून आजही राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून काही भागात ऑरेंज (Orange Alert) आणि यलो अलर्ट (Yellow Alert) जारी करण्यात आला आहे.

Rakhi Sawant । राखी सावंतने भर पावसात डोक्यावर फोडली अंडी; व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल थक्क

कोकणासह रायगड, रत्नागिरी, पालघर तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. सिंधुदुर्ग,सातारा, ठाणे, विदर्भातील गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूरमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

शरद पवारांना मोठा धक्का ते अनेक गौप्यस्फोट; वाचा अजित पवार गटाच्या पत्रकार परिषदेतील मुद्द्ये

Spread the love
Exit mobile version