Heavy Rain in Maharashtra । नागरिकांनो सावधान, पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांना हवामान खात्याने दिला मुसळधार पावसाचा इशारा

Heavy rain in Maharashtra. Citizens beware, the Meteorological Department has issued a warning of heavy rain to 'these' districts including Pune

Heavy Rain in Maharashtra । मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. त्यामुळे संकटात आलेल्या बळीराजाला खूप मोठा दिलासा आहे. यावर्षी पाऊस चांगला पडल्याने पेरण्यांना सुरुवात झाली आहे. परंतु काही भागात मुसळधार पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अशातच हवामान खात्याने पुन्हा एकदा राज्यातील काही जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

Maharashtra Rain | पावसाचे थैमान सुरूच! अंगावर वीज कोसळून तिघांचा बळी

हवामान खात्याच्या अंदाजानुसार सात जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकतो. गडचिरोली, चंद्रपूर, सातारा, पुणे, रत्नागिरी या पाच जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी तर मुंबई, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच या जिल्ह्यात 28, 29 जुलैसाठी येलो अलर्ट जारी केला आहे.

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! PM किसानचा 14 वा हप्ता आज होणार खात्यात जमा, मोदींच्या हस्ते वितरण होणार

त्याशिवाय कोल्हापूरमध्येही मागील काही दिवसांपासून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. पंचगंगेच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. अशातच आता पुन्हा एकदा या जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तर पुढील दोन दिवसांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे.

Sharad Pawar । ब्रेकिंग! केंद्रीय निवडणूक आयोगाची शरद पवार गटाला नोटीस

राज्यासाठी पुढचे पाच दिवस खूप महत्त्वाचे असणार आहेत. या दरम्यान, राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस पडू शकतो. त्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून महत्त्वाचे काम असेल तर घराबाहेर पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे यांना पुन्हा मोठा धक्का! ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका महिलेचा शिंदे गटात प्रवेश

Spread the love