
Monsoon Update । राज्यात यंदा उशिरा का होईना विजांच्या गडगटासासह मुंबईसह कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रात पावसाने (Monsoon) जोरदार हजेरी लावली आहे. वादळी वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसाने मुंबईतील (Mumbai) आणखी एकाचा बळी गेला आहे. दरम्यान, मागील तीन आठवडयातही आणखी तिघांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Latest Marathi News)
Ajit Pawar । अजित पवार मुख्यमंत्री होणार! भाजप नेत्याच्या दाव्याने खळबळ
मुंबईतील मालाड (Malad) येथे ही दुर्घटना घडली आहे. मालाड पूर्व बच्चानी नगर, दफ्तरी रोड येथील एका खासगी जागेत असणारे जांभळाच्या झाडाची मोठी फांदी दोन महिला आणि एका मुलाच्या अंगावर कोसळली. त्यानंतर जखमींना तातडीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर शताब्दी रुग्णालयात दाखल केले. परंतु गंभीर जखमी झाल्याने एका महिलेचा उपचारापूर्वी मृत्यू झाला असे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. दरम्यान, इतर दोन जखमींची प्रकृती चांगली आहे.
अजित पवारांना पुतण्या देणार शह! आगामी निवडणुकीसाठी पवार कुटुंबातील ‘या’ सदस्याची चर्चा
राज्यात यावर्षी पावसाने (Rain in Maharashtra) उशिरा हजेरी लावली आहे. विजांच्या गडगटासासह मुंबईमध्येही जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे मुंबईकरांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे. दरम्यान,वादळी वाऱ्यामुळं ठिकठिकाणी झाडे पडली असून काही ठिकाणी घरांवरील पत्रे उडून गेल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच मुंबईत पुन्हा मुसळधार पाऊस पडणार असल्याचे हवामान खात्याचे मत आहे.
ब्रेकिंग! छगन भुजबळ यांच्यानंतर धनंजय मुंडेंनाही जीवे मारण्याची धमकी; राजकीय वर्तुळात उडाली खळबळ
हे ही पहा