Weather Update । मागील काही दिवसापासून देशात मुसळधार पावसाने (Heavy rain) हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे पूर आला आहे. ठिकठिकाणी घरे, रस्ते देखील पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशातच हवामान विभागाने (IMD) पुन्हा एकदा देशासह राज्यात आठवडाभर मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. (Latest Marathi News)
उद्धव ठाकरेंना ‘मशाल’ मिळणार? सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीकडे सगळ्यांचे लक्ष
हवामान विभागाकडून पुढील आठवड्यात कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्याशिवाय महाराष्ट्र राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. आज पुण्यात ऑरेंज अलर्ट (Orange Alert) तर कोकण, पश्चिम महाराष्ट्र्र आणि विदर्भात यलो अलर्ट (Yellow Alert) देण्यात आला आहे.
के. एस होसाळीकर यांच्या माहितीनुसार, पुढील 4-5 दिवस मान्सून सक्रिय राहू शकतो. कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार पाऊस पडेल.पुण्यात (Pune) आज ऑरेंज अलर्ट दिला असून उर्वरित महाराष्ट्रात आज हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे नागरिकांनी हवामानाचा अंदाज घेऊनच घरातून बाहेर पडावे.
अधिवेशनाला आजपासून सुरूवात, संपूर्ण महाराष्ट्राचे ‘या’ मुद्द्यांकडे लक्ष
त्याशिवाय मागील काही दिवसांपासून उत्तर भारतात पावसाचा कहर सुरू आहे. याचा मोठा फटका दिल्ली (Delhi) शहराला बसला आहे. दिल्लीत पावसाने 45 वर्षांपूर्वीचा 207.49 मीटरचा विक्रम मोडला आहे. यमुना नदीची पातळी मंगळवारपर्यंत 205.33 मीटरपर्यंत वाढणार आहे असे सांगण्यात येत आहे.
Rohit Pawar | धक्कादायक! रोहित पवारांचे पुण्यातील कार्यालय जाळण्याचा प्रयत्न