महाराष्ट्रामध्ये पाऊस (Rain in Maharashtra) कधी पडेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. खासकरून शेतकऱ्यांचे पाऊसाकडे जास्तच लक्ष लागून राहिले आहे. त्यामुळे सर्वजण पावसाची वाट पाहत आहे. आता पावसाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. 12 जूनला म्हणजेच आज राज्यातील काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
मोठी बातमी! पुण्यात नवले ब्रिज जवळ भीषण अपघात; ट्रकचालकाचे नियंत्रण सुटले अन्..
आज हवामान विभागाकडून महाराष्ट्रात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र (Konkan, Marathwada, Madhya Maharashtra) या ठिकाणी आज वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान, केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये कधी येणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
वारकऱ्यांवर झालेल्या लाठीमाराची घटना मनाला दुःख देणारी, अजित पवार संतापले
व्हिडीओ पाहिला का?