
Weather Update । महाराष्ट्रात यावर्षी मान्सूनचं आगमन उशिरा झाले. यावर्षी मान्सून तळ कोकणात दाखल झाल्यानंतर बिपरजॉय चक्रीवादळाचा (Cyclone Biperjoy) मोठा फटका राज्याला बसल्याने मान्सूनची गती मंदावली. त्यानंतर चक्रीवादळाचा प्रभाव कमी झाल्यानंतर मान्सूनने राज्यात (Rain in Maharashtra) चांगलीच हजेरी लावली आहे. ठिकठिकाणी मुसळधार पावसाने (Weather Update) जनजीवन विस्कळीत झाले आहे. तरीही पावसाचा कहर अजून सुरूच आहे. (Latest Marathi News)
अजित पवारांचे बंड फसणार! राज्यात पुन्हा तिसरा भूकंप येणार, काँग्रेसच्या बड्या नेत्याचा दावा
हवामान विभागाकडून (IMD) आज कोकण विभाग आणि तळ कोकणात यलो अलर्ट (Yellow Alert) देण्यात आला आहे. तसेच आज पालघर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. देशातील अनेक राज्यांना हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा दिला आहे.
“फडणवीस मोंदींची थुंकी झेलून म्हणाले”…. ‘सामना’ तून भाजपवर बोचरी टीका
देशभरात जरी पावसाने धुमाकूळ घातला असेल तरीही महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पावसाने दडी मारली आहे. पावसाअभावी पेरण्या लांबणीवर पडल्या आहेत. काही शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांवर संकट आले आहे.
भीषण अपघात! ट्रकने चार वाहनांना चिरडले, एकाच जागीच मृत्यू तर तीन जण गंभीर जखमी