मागच्या काही दिवसापासून वातावरणात बदल झाले असून बऱ्याच ठिकाणी पाऊस (Rain) पडला आहे. या अवकाळी पावसाने शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कांदा, गहू, फळपिके, अशा अनेक पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकरी (Farmer) चिंतेत आहे. एकीकडे पिकाला भाव मिळत नाही आणि दुसरीकडे अवकाळी पावसामुळे शेतपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे आता शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.
धक्कादायक! आयटी इंजिनिअरने पत्नी व मुलाचा खून करून केली आत्महत्या
दरम्यान, हवामान विभागाच्या अंदाजानुसार (According to weather department forecast) आज देखील राज्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यात 20 मार्चपर्यंत पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. म्हणजेच अजून पुढचे तीन दिवस राज्यात पावसाची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी त्यांच्या पिकाची काळजी घ्यावी असं आव्हान कृषी विभागानं केलं आहे.
कोल्हापूरमधील तरुणीची आत्महत्या; तरुणाच्या त्रासाला कंटाळून घेतला निर्णय
राज्यात मराठवाडा, मध्यमहाराष्ट्र, कोकण आणि विदर्भात आज गारपिटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्याचबरोबर अन्य काही जिल्ह्यात देखील पावसाचा यलो अलर्ट देण्यात आलाय. (Marathwada, Madhyamharashtra, Kokan, Vidarbha)
भर उन्हामध्ये झाली ढगफुटी? व्हिडीओ पाहून डोकं चक्रावेल; पाहा VIDEO