यावर्षी राज्यात पावसाने (Rain) उशिरा हजेरी लावली आहे. मागील काही दिवसांपासून मुंबईसह (Mumbai) राज्यातील वेगवगेळ्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. परंतु काही ठिकाणी पावसाने पाठ फिरवली आहे. अशातच आता हवामान खात्याने (IMD) काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. (Latest Marathi News)
Shah Rukh Khan। अपघातनंतर पहिल्यांदाच मुंबई एअरपोर्टवर स्पॉट झाला शाहरुख, पहा व्हिडिओ
मुंबईमध्ये आज काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. इतकेच नाही तर गुरुवारी आणि शुक्रवारीदेखील काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज असून यादरम्यान ‘यलो अलर्ट’ (Yellow Alert) जारी केला आहे. त्याशिवाय आज पुणे सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड तसेच सिंधुदूर्ग या जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेमका कुणाचा? आमदारांची सत्वपरिक्षा, आजच्या बैठकीकडे सगळ्यांचे लक्ष
तसेच गुरुवारीदेखील हवामान खात्याने पुणे आणि साताऱ्यात (Satara) मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. उशिरा का होईना राज्यात पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे, ठिकठिकाणी पेरण्यांना सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे राज्यात अजूनही काही ठिकाणी पावसाने दडी मारली आहे.
घृणास्पद! आदिवासी तरुणाच्या चेहऱ्यावर भाजप नेत्याने केली लघुशंका, व्हिडीओ व्हायरल
हे ही पहा