राज्यासह देशभरात पावसाने थैमान घातले आहे. काल राजधानी दिल्लीसह (Delhi) उत्तर भारतातील अनेक भागात मुसळधार पाऊस झाला. त्याचबरोबर आजही उत्तर भारतातील बहुतांश भागात पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. दिल्ली-एनसीआरमधील लोकांना पावसापासून दिलासा मिळण्याची अपेक्षा नाही, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. (Latest Marathi News)
Supriya Sule । सुप्रिया सुळेंना मोठा धक्का! खासदारकी येणार अडचणीत?
आज देखील मुसळधार पाऊस (Heavy Rain) पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने आजसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. दिल्लीत काल मान्सूनच्या मोसमातील पहिल्या मुसळधार पावसाने 20 वर्षांचा विक्रम मोडला. मुसळधार पावसामुळे राष्ट्रीय राजधानीच्या अनेक भागात पाणी साचले, झाडे उन्मळून पडली, वाहनांचे नुकसान झाले आणि वाहतूक कोंडी देखील झाली.
मुसळधार पावसामुळे दिल्लीतील रस्ते जलमय
हवामान विभागाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील प्राथमिक हवामान केंद्र असलेल्या सफदरजंग वेधशाळेने सकाळी 8.30 ते संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत 126.1 मिलीमीटर (मिमी) पावसाची नोंद केली. त्यांनी सांगितले की, पावसाचा हा आकडा 10 जुलै 2003 नंतर सर्वाधिक असून त्यानंतर 24 तासांत 133.4 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
मोठी बातमी! कंटनेर आणि एसटीचा भीषण अपघात, महिला प्रवासी गंभीर जखमी
दिल्लीत पावसामुळे तुंबलेले नाले आणि तुंबलेल्या रस्त्यांमुळे वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. पाणी साचल्यामुळे काही रस्ते वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आले. अशा स्थितीत आजचा पाऊसही कालप्रमाणेच नागरिकांसाठी त्रासदायक ठरू शकतो. असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! विधानसभा अध्यक्षांनी बजावली शिंदे गटाच्या 40 आमदारांना नोटीस