पुणे ( pune ) शहरामध्ये काही ठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे. औंध, बाणेर रोड, विद्यापीठ परिसर, सांगवी या भागामध्ये वाऱ्याला सुरुवात होऊन जोरदार पाऊसाला सुरुवात झाली. यावर्षी मान्सून ( Monsoon ) लांबणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यामुळे मान्सूनपूर्व पावसामुळे नागरिकांची खळबळ उडाली आहे.
अहमदनगर जिल्ह्यात सुसाट्याचा वारा, तुरळक पाऊस; शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान
पुणे शहरांमध्ये जोरदार पाऊस पडल्यामुळे पुण्यातील मुख्य रस्त्यांवरून वाहतूक कोंडीची ( Traffic congestion ) समस्या निर्माण झाली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्याचा व पावसाचा अंदाज सांगण्यात आला होता. सोलापूर, बीड, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, लातूर, नांदेड, बुलढाणा, वाशिम, अहमदनगर, नाशिक, पुणे, सातारा, अकोला, यवतमाळ, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, मुंबई, रायगड या जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मोठी बातमी! ओडिशातील अपघाताचे रेल्वेमंत्र्यांनी सांगितले खरे कारण; ऐकून तुम्हीही व्हाल थक्क
बाणेर, पाषाण व पश्चिम महाराष्ट्रात पाऊस सुरू झाला आहे. पाऊस पडल्यामुळे गर्मी पासून नागरिकांना सुटका मिळाली आहे. परंतु पुण्यामध्ये किरकोळ खड्ड्यामुळे अपघात देखील होत आहेत. व पुण्यामध्ये मोठी वाहतूक कोंडी झाल्याची देखील माहिती मिळाली आहे.
धक्कादायक! मित्राचा वाढदिवस केला दणक्यात साजरा, अन् काढला काटा; होत ‘हे’ कारण