
पुणे : मुसळधार पावसाने (Haivy rain) पुणे शहरात (Pune) विविध ठिकाणी पाणी (Water) शिरल्याच्या व इतर घटनांच्या अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षात तक्रारी येत होत्या. अवघ्या काही तास झालेल्या पावसाने रस्त्यांवर पुरस्थिती (condition) निर्माण झाली होती. अनेकांच्या घरातही पाणी शिरले होते. संपूर्ण शहरात काही तासांच्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाल्याचे पहायला मिळत होते. या मुसळधार पावसात अडकलेल्या 12 जणांची अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी (Firefighters) सुखरूप सुटका केली आहे. त्यांचे सर्व स्तरातून काैतुक होत आहे.
शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांना ह्रदयविकाराचा झटका, मुंबईच्या लीलावती रुग्णालयात उपचार सुरू
स्वरुपवर्धिनी जवळील एका घरात पाणी जमा झाले होते. अचानक पाणी घरात शिरल्याने घरातील लोकांची तारांबळ उडाली. पाऊस बंद झाला की पाणी कमी होईल म्हणून घरातील लोकांनी काहीवेळ थांबण्याचा विचार केला, पण पाणी वाढतच गेल्याने अखेर त्यांनी अग्निशमन दलाकडे मदती मागितली आणि काहीवेळातच या कुटुंबाची सुटका अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी केली.
‘सैराट’मधील लंगड्या आणि सल्या दिसणार ‘या’ चित्रपाटाच्या मुख्य भूमिकेत
शहरातील अनेक ठिकाणी शॉर्टसर्किट आणि झाडे पडल्याच्या घटना घडल्या. पण अग्निशामक दलाच्या तत्परतेमुळे अनेकांचे प्राण वाचवण्यात यश आले. कोंढव्यातील भाजी मंडईजवळ पाण्यात अडकलेल्या सात नागरिकांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. अग्निशमन दलाच्या रवि बारटक्के, सागर इंगळे, जवान निलेश लोणकर, नारायण मिसाळ, सुरज माळवदकर, अनिकेत गोगावले व चालक दिपक कचरे यांनी ही कामगिरी पार पाडली.
आयएएस अधिकाऱ्याने 21 वर्षीय महिलेला नोकरीचे आश्वासन देत केले ‘हे’ कृत्य