
बॉलिवूड मधील सुप्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमारचा हेरा फेरी 3 ( Hera Feri 3) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मागील काही महिन्यांत अक्षय कुमारचे ( Akshay Kumar ) चित्रपट बॉक्स ऑफिसवर सलग फ्लॉप होत आहेत. प्रेक्षकांनी अक्षरशः त्याच्या चित्रपटांकडे पाठ फिरवली आहे. अशातच अक्षय कुमार हेरा फेरी 3 मधून जोरदार कमबॅक करेल असे सर्वांना वाटत होते. मात्र त्याचा हा चित्रपट देखील आता अडचणीत आला आहे. ( New Movie)
आज ‘या’ राशीच्या लोकांना मिळतील इच्छित फायदे, जाणून घ्या कसा जाईल तुमचा संपूर्ण दिवस
इरॉस इंटरनॅशनल ट्रेंड मॅगझिनने अक्षय कुमारच्या हेरा फेरी 3 चित्रपटाविरोधात कायदेशीर नोटीस बजावली आहे. या नोटीसमध्ये हेरा फेरी 3 चित्रपटाचे हक्क इंटरनॅशनल ट्रेंड मॅगझिनकडे असल्याचा दावा करण्यात आला आहे. याआधी देखील टी सिरीजने या चित्रपटाविरोधात नोटीस जारी केली होती. यामुळे हेरा फेरी 3 चित्रपट चांगलाच अडचणीत सापडला असून चित्रपटाचे निर्माते टेन्शनमध्ये आहेत.
दरम्यान, या चित्रपटामुळे अगदी सुरवातीपासूनच अक्षय कुमार चर्चेत आहे. त्याने आधी या चित्रपटाला नकार दिला होता. स्क्रिप्ट आवडली नसल्याने आपण हा चित्रपट करत नसल्याचे अक्षय कुमारने म्हंटले होते. मात्र, काही दिवसांनी त्याने या चित्रपटाला होकार देऊन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. या चित्रपटात अक्षय कुमार सोबत संजय दत्तने देखील काम केले आहे. परंतु, वादाच्या भोवऱ्यात अडकलेला हा चित्रपट कधी प्रदर्शित होईल ? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.