Hero Passion Plus : हिरो कंपनीने (Hero MotoCorp) ३ वर्षानंतर पॅशन प्लस दुचाकी नवीन रुपासह लॉन्च केली आहे. त्यामुळे ग्राहकांना पुन्हा एकदा दमदार फीचर्ससह दुचाकी खरेदी करण्याची संधी मिळत आहे. हिरो कंपनीच्या (Hero Company) दुचाकींना बाजारपेठेत अधिक मागणी आहे. याचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. तसेच दुचाकीची किंमत कमी असल्याने अनेकजण याकडे आकर्षित होत आहेत.
Video | उर्फी जावेदचा ‘तो’ व्हिडिओ पाहून नेटकरी संतापले; म्हणाले, “तुला काही…”
कंपनीकडून या दुचाकीच्या किंमतीमध्ये देखील बदल करण्यात आला आहे. या दुचाकीची एक्स-शोरूम किंमत 76,301 रुपये ठेवण्यात आली आहे. या दुचाकीचे उत्पादन 2020मध्ये बंद करण्यात आले होते. मात्र आता तीन वर्षानंतर कंपनीने ही दुचाकी पॉवरफुल इंजिनसह लॉन्च केली आहे. तसेच याचा लूक देखील जबरदस्त देण्यात आला आहे.
मोठी बातमी! बिपरजॉय चक्रीवादळाचा धोका पाहता गुजरातने 30,000 लोकांना पाठवलं सुरक्षित स्थळी
हिरो कंपनीकडून सुरुवातीला पॅशन प्लस दुचाकी लॉन्च केल्यानंतर लोकांचाही चांगला प्रतिसाद मिळाला होता. मात्र कंपनीकडून काही कारणास्तव या दुचाकीचे मॉडेल बंद करण्यात आले होते. मात्र आता दुचाकीच्या बॉडी पॅनल्सवर काही नवीन ग्राफिक्सचा समावेश केला आहे. तसेच ही बाइक स्पोर्ट रेड, ब्लॅक नेक्सस ब्लू आणि ब्लॅक हेवी ग्रे या रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.
मोठी दुर्घटना! बोट उलटली अन् १०० लोकांचा बुडून मृत्यू, अनेक जण बेपत्ता
यामध्ये पूर्वीप्रमाणेच 97.2 सीसी क्षमतेचे सिंगल सिलिंडर, एअर-कूल्ड इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 7.89 एचपी पॉवर आणि 8.05 एनएम टॉर्क जनरेट करते. यात देण्यात आलेले इंजिन 4-स्पीड ट्रान्समिशन गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. याशिवाय, इंजिन आता नवीन रिअल ड्रायव्हिंग एमिशन (RDE) नियमांनुसार अपडेट केले आहे तसेच यामध्ये खास i3S स्टार्ट/स्टॉप तंत्रज्ञान वापरले आहे.
Ajit Pawar । अजित पवार यांचा मोठा दावा; म्हणाले, “मला शिंदे गटाच्या काही खासदारांनी…”
नवीन पॅशन प्लस दुचाकीमध्ये सुरक्षेच्या दृष्टिकोनातून दोन्ही चाकांना 130 मिमी ड्रम ब्रेक देण्यात आले आहेत. या बाईकचे एकूण वजन 115 किलो आहे. तसेच ही 100 सीसी सेगमेंटमधील सर्वात वजनदार दुचाकीआहे.यामध्ये इलेक्ट्रिक-स्टार्ट, सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि यूएसबी चार्जिंग पोर्ट अशी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क्स आणि ट्विन रिअर शॉक शोषक बाईकमध्ये वापरण्यात आली आहेत.
Supriya Sule । “तुमचा दिल्लीत करेक्ट कार्यक्रम करते”, सुप्रिया सुळेंचा केंद्र सरकारला गंभीर इशारा