आपण नेहमी पाहतो किंवा नेहमी अनुभवत असतो की, वाहन चालवत असताना अनेकदा चालकाच्या ड्रायव्हिंग (Driving) कौशल्यावर प्रश्नचिन्ह उभे केले जातात. मग यामध्ये विशेषकरून महिलांना (Womens Driving) चुकीच्या पद्धतीनं ट्रोल केलं जातं. त्यामुळे प्रसाशनाकडून वारंवार बजावूनही शिस्तीचं, वाहतुकीच्या नियमांचं (Traffic rules) पालन केलं जात नाही. इतकंच नाही तर हे वाहन चालवणे कधी कधी जीवावरही बेतू शकतं. दरम्यान सोशल मीडियावर (Social media) अलिकडे एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक तरूणी स्कूटी (scoty) चालवताना तोल गेलेली दाखवण्यात आली आहे. काही लोक तर अगदी विचित्र पद्धतीने स्वत:च्या पायावर कुऱ्हाड मारताना दिसतात.
या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये स्कूटी चालणारी एक मुलगी रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकमध्ये शिरताना दिसत आहे. या व्हायरल झालेल्या 16 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये एक पिवळ्या रंगाचा ट्रक रस्त्याच्या कडेला तिरकस उभा असलेला दिसत आहे. तसेच या ट्रकमधून खडे किंवा रेती खाली उतरवली जात असल्याचं दिसून येतं. यादरम्यान अनेक दुचाकीस्वार ट्रकच्या पुढे जाऊ लागतात, पण स्कूटी चालवणारी एक मुलगी ट्रकपासून दूर जाण्याऐवजी स्कूटी पुढे लावते.
पापा की परी… pic.twitter.com/icfhzFGoSv
— सुनील पंवार (@Sunilpanwar2507) October 27, 2022
पंचनाम्यासाठी शेतकऱ्यांनाच मागितले पैसे, ‘या’ जिल्ह्यात घडला धक्कादायक प्रकार
सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. परंतु हा व्हिडीओ पाहिल्यानंतर यूजर्समध्ये एकच हशा पिकला आहे. हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला शेअर करताना ‘Papas angel’ असे कॅप्शन देण्यात आले आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर यूजर्स त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. दरम्यान एका यूजरने लिहिले की, ‘सगळी चूक ट्रक ड्रायव्हरची आहे’.
Instagram: बिग ब्रेकिंग! इंस्टाग्रामचे अकाउंट होतंय अचानक सस्पेंड