मुंबई : महाराष्ट्रातील जिल्ह्यांना पालकमंत्री (Guardian Minister)कधी मिळणार?कारण महाराष्ट्रात एकनाथ शिंदे(Eknath Shinde) व देवेंद्र फडणवीस(Devendra Fadanvis) यांचं सरकार स्थापन होऊन जवळपास दोन महिने उलटले आहेत. अजूनही जिल्ह्यांना पालकमंत्री नसल्याने जिल्हास्तरावर अनेक प्रश्न सोडवण्यास विलंब होत आहे. म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya sule)यांनी नवीन सरकारचा हनिमून आणखी किती दिवस टिकणार आहे, हेच मला कळत नाही, अशी टीका सुप्रिया सुळेंनी केली आहे.
“महाराष्ट्राला आणि पुणे जिल्ह्याला एक पालकमंत्री मिळावा म्हणून मी देव पाण्यात घालून बसलेय, मला अनाथ झाल्यासारखं वाटतंय असं देखील सुप्रिया सुळे म्हणाल्या.पुढे त्या म्हणाल्या की, “विमानतळ होणार की नाही? जलजीवन मिशनचं काय होणार? शाळा, अंगणवाड्यांचं काय होणार? आम्ही विरोधक असलो तरी माझी इच्छा आहे की कोणत्याही सरकारने आपला कार्यकाळ पूर्ण करावा. कारण त्यात सर्वसामान्य माणूस भरडला जातो. जस बोलतात तस काम मात्र होत नाहीये.या नवीन सरकारचा हनिमून आणखी किती दिवस टिकणार आहे, हे मला कळत नाही.
अजित पवार पालकमंत्री होते तेव्हा…
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, दोन महिने झाले पण अद्याप पालकमंत्री मिळाले नाहीत. अजित पवार पालकमंत्री होते, तेव्हा कुठल्याही पक्षाचा माणूस हक्काने अजित पवारांना भेटायचा. आमच्या वैचारिक विरोधकांनाही विचारा, अजित पवारांनी कधीही कुणाला विकासकामांना नाही म्हटलं नाही.
ग्रामीण रस्त्यांसाठी शासनाने भरीव निधी उपल्बध करून द्यावा – आमदार राहुल कुल