अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ यांची शनिवारी रात्री हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेनंतर, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (UP CM ) यांनी रात्री उशिरा झालेल्या बैठकीत राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे आणि कायदा व सुव्यवस्था राखण्याचे निर्देश दिले आहेत.
मुख्यमंत्री कार्यालयाच्या निवेदनानुसार, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पोलीस अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे, राज्यात शांतता आणि कायदा व सुव्यवस्था राखण्याचे निर्देश दिले आहेत. यासोबतच लोकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी घेण्यास सांगितले आहे.
ब्रेकिंग! अजित पवार यांना शिवसेनेच्या बड्या नेत्याची खुली ऑफर; चर्चांना उधाण
या संदर्भात योगी आदित्यनाथ यांनी जनतेला या घटनेच्या अफवांकडे लक्ष देऊ नका असे आवाहन केले आहे. त्याचबरोबर अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.” असं देखील यावेळी योगी आदित्यनाथ यांनी सांगितलं आहे.
शेतकऱ्यांची मुलं राहतायत बिनलग्नाची! शेवटी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतलाय पुढाकार