Maratha Protest HC । मराठा समाजाच्या आंदोलनाने राज्याचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. जोपर्यंत आरक्षण (Maratha reservation) मिळत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही अशी भूमिका मराठा समाजाने घेतली आहे. याच पार्शवभूमीवर आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) येत्या २६ जानेवारीपासून मुंबईत चक्काजाम आंदोलन करणार आहेत. अशातच आता मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी आहे. (Latest marathi news)
Lok Sabha Election 2024 । इंडिया आघाडीला सर्वात मोठा झटका! ममता बॅनर्जी स्वबळावर लढवणार निवडणूक
मराठा आंदोलनाविरोधातील याचिका न्यायमूर्ती गडकरी यांच्या खंडपीठाने स्वीकारली आहे. त्यावर आज दुपारी अडीच वाजता तातडीची सुनावणी पार पडणार आहे. दरम्यान, मनोज जरांगे यांच्यासह मराठा आंदोलकांना (Maratha protesters) मुंबईत येण्यापासून रोखा, अशी याचिका सदावर्ते यांच्याकडून हायकोर्टात (High Court) दाखल करण्यात आली होती.
Bachchu Kadu । मराठा समाजाला आरक्षण कधी मिळेल? बच्चू कडू यांनी सांगितली आरक्षणाची तारीख
त्यांची ही मागणी न्यायालयाने मान्य केली आहे. आज दुपारीच या याचिकेवर मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार आहे. त्यामुळे आता दुपारी होणाऱ्या या याचिकेच्या सुनावणीकडे मराठा समाजासह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळते का? आता हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.