High Court on Hijab । शाळा-महाविद्यालयांमध्ये बुरखा-हिजाब घालण्यास परवानगी देण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय आला आहे. उच्च न्यायालयाने याचिका रद्द केली आहे. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये नियमानुसार ड्रेस कोड लागू असेल. (Bombay High Court on Hijab)
Pune Accident l पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणी एकनाथ शिंदेनी घेतला सर्वात मोठा निर्णय!
मुंबई उच्च न्यायालयाने याचिका फेटाळून लावत कॉलेजमध्ये ‘हिजाब बंदी’ योग्य असल्याचे सांगितले. चेंबूरच्या आचार्य-मराठा कॉलेजने ड्रेसकोडद्वारे हिजाब बंदी लागू केली होती. 9 विद्यार्थिनींनी हिजाब बंदीला दिलेले आव्हान मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावले.
काय म्हणाले हायकोर्ट?
हिजाबवरील बंदी धार्मिक स्वातंत्र्याचे उल्लंघन असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. मात्र, महाविद्यालयाने उच्च न्यायालयात केलेल्या याचिकेत केलेल्या आरोपांचे ठामपणे खंडन केले. कोणत्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही, सर्व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना समान नियम लागू होतील.