मुळा हे रब्बी हंगामातील (Rabbi Season crop) एक महत्त्वाचे पीक आहे. कमी वेळेत जास्त नफा मिळवून देणारे पीक म्हणून याची ओळख आहे. गुजरात, हिमाचल प्रदेश आणि उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, पंजाब, आसाम आणि हरियाणा या राज्यांमध्ये मुळ्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. कमी खर्चात मुळ्याची लागवड करून शेतकरी चांगला आर्थिक फायदा (profit) मिळवू शकतात.
उष्ण तापमानात मुळ्याची लागवड केल्यास त्याची मुळे कडक व कडू होऊ शकतात. यासाठी कमी तापमानात हे पीक घेतात. 10 ते 15 सेल्सिअस तापमान या पिकासाठी पोषक असते. सेंद्रिय चिकणमाती किंवा वालुकामय चिकणमातीमध्ये मुळ्याची लागवड केली जाते. यासाठी मातीचा पोत सुमारे 6.5 असा असावा. मैदानी भागात सप्टेंबर ते जानेवारी या काळात मुळा लावला जातो तर डोंगराळ भागात ऑगस्ट पर्यंत मुळा लावतात.
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम वनिता खरात अडकली लग्नबंधनात; पाहा PHOTO
मुळा लावण्यापूर्वी शेतकऱ्यांनी चांगले शेत तयार करावे. यासाठी चार ते पाच वेळा नांगरणी केलेली असावी. ही नांगरणी खोल करावी. यासाठी फिरणाऱ्या नांगर यंत्राचा वापर करणे फायद्याचे ठरू शकते. . मुळा पिकाला पांढरा गंज, सर्कोस्पोरा कॅरोटी, पिवळा रोग, अल्टरनेरिया पान, ब्लाइट यासारख्या रोगांचा त्रास होतो. हे रोग होऊ नयेत म्हणून डायथेन एम ४५ किंवा झेड ७८ या बुरशीनाशकाचे ०.२ टक्के द्रावण पिकांवर फवारावे किंवा ०.२ टक्के ब्लाइटेक्स पिकांवर फवारावे.
सत्यजीत तांबेंच्या विजयानंतर त्यांच्या मुलीने दिली प्रतिक्रिया; म्हणाली, “माझे बाबा फार…”