Gautam Adani | हिंडनबर्गच्या रिपोर्टमुळे मागील काही दिवसांपासून अदानी समूहाला उतरती कळा लागली आहे. या रिपोर्टमुळे अदानी समूहाची खूप मोठे नुकसान झाले आहे. सध्या अदानी आणि त्यांचा समूह पूर्ववत होण्यासाठी प्रयत्न करत आहे. यावर आता भारतातील मोठे व्यवसाय गौतम अदानी (Gautam Adani) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पती-पत्नीमधील कौटुंबिक वाद गेला विकोपाला, पतीने मध्यरात्री केले धक्कादायक कृत्य की …
“हिंडनबर्गचा रिपोर्ट आपल्या कंपनीची बदनामी करण्यासाठी दिला होता, यातील माहिती आणि आरोप चुकीचे होते. आपल्या कंपनीची प्रतिमा खराब करून त्यामार्फत नफा कमवण्याचे उद्दिष्ट या कंपनीकडे होते,” असे आरोप अदानी यांनी केले आहे. अदानी एंटरप्राईजेसच्या वार्षिकी बैठकीला ते संबोधित करताना बोलत होते.
Uddhav Thackeray । विधिमंडळातलं चित्र बदलणार?, उद्धव ठाकरेंना अजून एक मोठा धक्का बसणार?
हिंडनबर्गने अदानी ग्रुपवर मनी लॉन्ड्री आणि शेअर मार्केट मॅन्युपुलेशनबाबत आरोप केले होते. या आरोपामुळे अदानी कंपनीचे शेअर्स 3500 वरून 1000 रुपयांवर आले होते. आता अदानींनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच पुढे त्यांनी भारत देश हा 2030 पर्यंत जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था असणारा देश बनेल. तसेच 2050 पर्यंत दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.