Maratha Reservation । मराठा समाजाला राज्य सरकारने शिक्षणात जाहीर केलेल्या 10 टक्के आरक्षणाला विरोध (Maratha Reservation Protest) केला जात आहे. यावरून वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांनी देखील मुंबई हायकोर्टात आव्हान दिलं आहे. या याचिकेवर तातडीने सुनावणी होणार आहे. पण आता यामुळे राज्यातील कर्मचारी भरतीत अडथळा येणार का? असा सवाल निर्माण होत आहे. (Latest marathi news)
Navneet Rana । मोठी बातमी! नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी, ‘या’ देशांचं कनेक्शन आलं समोर
दरम्यान, गुणरत्न सदावर्तेंच्या या याचिकेमुळे राज्यातील तब्बल 16 हजार पोलीस भरती, 2 हजार शिक्षक भरती आणि 50 हजार मेडिकल विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेत नवीन 10 टक्के आरक्षणाचा फायदा होईल, असे बोलले जात आहे. पण नव्या मराठा आरक्षणाचा फायदा या भरतीत द्यायला गुणरत्न सदावर्ते यांनी विरोध केला असून येत्या ८ मार्च रोजी यावर सुनावणी होणार आहे.
Crime News । धक्कादायक! भाजप आमदाराच्या पुतण्यावर भर बाजारात बेछूट गोळीबार, जागीच झाला मृत्यू
घटनेची पायामल्ली करत सरकारने हे आरक्षण दिले आहे, असे गंभीर आरोप जयश्री पाटील आणि गुणरत्न सदावर्ते यांनी याचिकेत केला आहे. तर 10 टक्के आरक्षण कायद्यानुसार असल्याच्या भूमिकेवर सरकार ठाम असून जर विनोद पाटील यांच्या वतीने मराठा आरक्षणाला समर्थन देत कॅवेट दाखल केल्यास हे आरक्षण कोर्टात टिकेल, असा दावा सरकारने केला आहे.
Politics News । उद्धव ठाकरे, मोदी पुन्हा एकत्र येणार? शिंदे गटातील नेत्याने स्पष्टच सांगितलं…