Lok Sabha Election 2024 । देशभरात सध्या निवडणुकीची (Lok Sabha Election) रणधुमाळी सुरु आहे. ठिकठिकाणी राजकीय नेतेमंडळी प्रचारसभा घेताना दिसत आहेत. अनेक नेते पक्षाने उमेदवारी नाकारल्याने दुसऱ्या पक्षात प्रवेश करत आहेत. एकीकडे निवडणुकीची तयारी सुरु आहे तर दुसरीकडे प्रहार पक्षाचे नेते बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. (Latest marathi news)
Sanjay Raut । संजय राऊत यांचा धक्कादायक दावा, म्हणाले; “फडणवीसांना अटक होण्याची भीती असल्याने…”
“मला अजूनही भिती आहे की, 26 तारखेला किंवा उद्या-परवा अमरावतीमध्ये हिंदू आणि मुस्लिम दंगल घडेल. त्यांची खालच्या पातळीवर येऊन निवडणूक जिंकण्याची सवय असल्याने आम्ही दोन पावलं मागे घेतली. नाहीतर रात्रीच या ठिकाणी आमचे 20 ते 25 हजार कार्यकर्ते आले असते. गृहमंत्र्यांनीच कायदा तोडला, त्यांनी सभा घ्यायला नको होती,” असे कडूंनी म्हटलं आहे.
Lok Sabha Election । भाजपला मोठा धक्का! निवडणुकीपूर्वी ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची होणार घरवापसी
पुढे ते म्हणाले की, ” आगामी निवडणुकीत नवनीत राणा आणि रवी राणा यांना पराभव दिसत आहे. 23 आणि 24 ला आम्हाला मैदान मिळाले होते. 23 तारखेलाच परवानगी मिळाली होती. पण आम्हाला 23 तारखेला दुपारी सांगितले की तुम्हाला परवानगी नाही आणि आमचा प्रचार थांबवण्यात आला. निवडणूक असल्याने म्हणून थांबलो, नाहीतर आमचा स्वभाव थांबण्याचा नाही,” असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे.
Nora Fatehi | अभिनेत्री नोरा फतेहीच धक्कादायक वक्तव्य; म्हणाली, ते माझ्या बॅाडी पार्ट्सवर…’