Hingoli News । सध्या एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एसटी बस चालवताना बस चालकाला हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याची माहिती समोर आली आहे. प्रवाशांनी भरलेली बस चालू असतानाच अचानक चालकाला हृदयविकाराचा तीव्र झटका आला चालकाच्या प्रसंगावधानामुळे बसमधील अनेक प्रवाशांचे प्राण वाचले मात्र बस चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. (Hingoli News)
Gas Cylinder Price । डिसेंबरच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका; गॅस सिलेंडरचे दर वाढले
मारुती नेमाने असे बस चालकाचे नाव आहे. मारुती नेमाने हे हिंगोलीच्या बस स्थानकात कार्यरत होते. नेहमीप्रमाणे ते बस घेऊन निघाले होते मात्र बस चालवत असतानाच अचानक त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला त्यांना वेदना होऊ लागल्या यानंतर त्यांना परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येता वेगवान बसचा वेग कमी केला आणि बस तात्काळ थांबवत बाजूला घेतली.
Gunaratna Sadavarte । गुणरत्न सदावर्ते यांना सर्वात मोठा झटका
त्यानंतर काही वेळातच मारुती यांनी एसटीच्या स्टेरिंग वरच प्राण सोडले. मात्र त्यांच्या मृत्यूमुळे प्रवाशासह बस स्थानकातील सहकाऱ्यांना देखील अश्रू अनावर झाले होते. मात्र मारुती नेमाने यांनी वेळीच बस थांबवल्याने मोठा अपघात टळला असल्याचे देखील बोलले जात आहे.
Raj Thackeray । मराठी पाट्या लावा नाहीतर तोंडाला काळ फासू – मनसे आक्रमक