Hiradgaon News । हिरडगाव, ता. श्रीगोंदा ग्रामपंचायत हिरडगाव हद्दीत नागनाथ आणि जगदंबा मंदिरे आहेत. या मंदिरांच्या देखभालीसाठी आणि धार्मिक उत्सवांच्या आयोजनासाठी १९८९ मध्ये विश्वस्त मंडळाची स्थापना करण्यात आली होती. परंतु, पोट नियमांनुसार दर पाच वर्षांनी ग्रामसभेतून विश्वस्त मंडळाची निवड केली गेली नसून अद्याप ही प्रक्रिया पूर्ण झालेली नाही.
Ajit Pawar | ‘संविधान वाचवू शकणारा जर कोणी असेल तर ते अजित पवारच आहे’ – प्रफुल्ल पटेल
यामुळेच गावातील तरुणांनी राजकारण बाजूला ठेऊन हा मुद्दा सर्वांच्या समोर मांडला आहे. काही मंडळी नियमांचा उल्लंघन करून बोगस भक्त मंडळाचे आडाखे रचत आहेत. हिरडगावच्या तरुणांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे मंदिरांच्या विश्वस्त मंडळाची निवड पारदर्शकतेने होईल. याबाबतच्या तक्रारी संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोहचवल्या जाणार आहेत.
तरुणांनी सरपंच व ग्रामसेवक यांना विनंती केली आहे की, ग्रामसभेचे आयोजन करून सर्व ग्रामस्थांना दवंडी देण्यात यावी. यामध्ये दोनही मंदिरांच्या विश्वस्त मंडळाची निवड पारदर्शकतेने व बहुमताने केली जावी. निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यावर, याबाबतची माहिती मा. धर्मादाय उपआयुक्त यांना पाठवावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
Election Commission । ब्रेकिंग! विधासभा निवडणुकीबाबत निवडणूक आयोगाने दिली महत्वाची माहिती
तरुणांनी चेतावणी दिली आहे की, जर कोणत्याही दबावाखाली चुकीची निवड झाली, तर त्यांचा न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार राखीव राहील. हे लक्षात घेतल्यास, सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर अधिक जबाबदारी निर्माण होते. सर्व ग्रामस्थांनी या महत्त्वपूर्ण विषयावर एकत्र येऊन निर्णय घेण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. मंदिरांच्या विश्वस्त मंडळाची योग्य निवड ही गावाच्या धार्मिक एकतेसाठी आवश्यक आहे. असे तरुणांनी मत व्यक्त केले.